E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जवान पूर्णम कुमार घरी परतले
Wrutuja pandharpure
25 May 2025
फुलांनी सजविलेल्या जीपमधून मिरवणूक
कोलकाता
: सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान पुर्णम कुमार नुकतेच पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील आपल्या घरी परतले. तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पूर्णम कुमार यांची फुलाने सजविलेल्या उघड्या जीपमधून हावडा रेल्वे स्थानक ते घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. भारत माता की जय, वंदेमातरम अशा घोषणा राष्ट्रध्वज फडकावत मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी दिल्या.
पूर्णम कुमार यांचे वडील भोलेनाथ रेल्वे स्थानकावर खास आले होते. मुलाला त्यांनी आनंदाने मिठी मारली. शेकडो नागरिक त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. मी परत आलो आहे, मी कुटुंबासमवेत आहे, असे माध्यमांना सांगताना त्यांच्या चेहर्यावर हास्य उमटले. ते आपल्या घरी पोहोचले. तेव्हा पत्नी आणि कुटुंबाने आनंदोत्सव साजरा केला. सुमधूर बँडवादनाने परिसर मंगलमय झाला. घर सजविले होते. रंगीबेरंगी दिव्यांनी चमकत होते. पत्नी रजनी यांनी परिसरातील नागरिकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला. पूर्णम यांचे बंधू राहुल यांनी सांगितले की, आम्ही आज दिवाळीच साजरी करत आहोत.. मी घरी आलो.आहे. आई वडील, बंधू आणि कुटुंबाला भेटलो, याचा आनंद अवर्णनीय असल्याची प्रतिक्रिया पूर्णम कुमार यांनी दिली. माझी सुटका व्हावी आणि मी लवकर परत यावे अशी प्रार्थना करणार्या देशवासियांचे मी आभार मानतो, असे ते म्हणाले. दरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती.
पहलगाम दहशतवादी हल्ला २२ एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान पंजाबच्या फिरोजपूर सीमेवर कार्यरत असताना पूर्णम कुमार हे चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. २३ एप्रिल रोजी त्यांना पकडले होते. सुमारे २१ दिवस त्यांना पकडून ठेवले होते. त्यांची पत्नी आणि कुटुंबीय त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होते. अखेर दोन्ही देशांत संघर्षबंदी झाल्यानंतर १४ मे रोजी त्यांची सुटका पाकिस्तानने केली होती.
Related
Articles
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
नायजेरियात १०० नागरिकांना खोल्यांमध्ये कोंडून जिवंत जाळले
16 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
नायजेरियात १०० नागरिकांना खोल्यांमध्ये कोंडून जिवंत जाळले
16 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
नायजेरियात १०० नागरिकांना खोल्यांमध्ये कोंडून जिवंत जाळले
16 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025
नायजेरियात १०० नागरिकांना खोल्यांमध्ये कोंडून जिवंत जाळले
16 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
वाचक लिहितात
17 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !